हरकती व सूचनांसाठी १४ मेपर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरकती व सूचनांसाठी १४ मेपर्यंत मुदत
हरकती व सूचनांसाठी १४ मेपर्यंत मुदत

हरकती व सूचनांसाठी १४ मेपर्यंत मुदत

sakal_logo
By

महाड, ता. १० (बातमीदार) ः राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम २०२२ जाहीर झालेला आहे. या प्रभाग रचनेवर नव्याने प्राप्त होणारे आक्षेप व हरकतींवर सुनावणी देण्यात यावी, असे आदेशही आयोगाने दिल्याने रायगड जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांसाठी हरकती व सूचना मागविण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्‍यानुसार प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना १० मार्च २०२२ ला प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या आक्षेप व हरकतींसह सुधारित कार्यक्रमानुसार नव्याने प्राप्त होणारे आक्षेप व हरकतींवर सुनावणी होणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केले असून यावर हरकती व सूचना मागवण्यासाठी प्रत्येक नगरपालिका कार्यालयात कार्यक्रम जाहीर केला आहे. हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी मंगळवार, १० ते १४ मे २०२२ पर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत राहणार आहे.
....

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07677 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top