जनावरांची वाहतूक करणारे गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनावरांची वाहतूक करणारे गजाआड
जनावरांची वाहतूक करणारे गजाआड

जनावरांची वाहतूक करणारे गजाआड

sakal_logo
By

महाड, ता. १० (बातमीदार) : महाड तालुक्यात कत्तलीसाठी जनावरांची चोरी आणि कत्तलीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता बैलांची चोरी करून वाहतूक करणाऱ्या एका पिकअपवर सोमवारी (ता. ९) पोलिसांनी कारवाई केली आहेत. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
हनिफ कोंडेकर (रा.मंडणगड) आणि मोहम्मद चोगले (रा. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारुती आंधळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. मुंबई-गोवा महामार्गावरून राजेवाडी फाटा येथे सोमवारी एक संशयास्पद पिकअप जात असताना पोलिस हवालदार सागर अष्टमकर यांना दिसली. त्‍यांनी गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु गाडी न थांबताच पुढे गेली. पोलिसांनी पाठलाग करून वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये पाच बैल पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी गाडीमधील एक लाख १२ हजार रुपये किमतीचे पाच बैल ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी हनिफ कोंडेकर आणि मोहम्मद चोगले यांना अटक केली आहे. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरात पाच घटना घडल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07681 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top