
रायगडवाडीत झोलाई देवीचा उत्सव
महाड, ता. २२ (बातमीदार) : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावामध्ये श्री झोलाई देवीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. या वेळी रायगडवाडी परिसरासह मुंबई, पुणे, सुरत, बडोदा आदी ठिकाणी वास्तव्यास असलेले रायगडवाडीमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री झोलाई देवीचा वार्षिक उत्सव या वर्षी गुरुवारी (ता. १९) रायगडवाडी ग्रामस्थांतर्फे आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यानिमित्त गावातील, तसेच अन्य शहरात वास्तव्यास असलेली ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर झाले होते. विधिवत पूजा-परंपरेनुसार मंदिरामध्ये पूजन केल्यानंतर देवीची पालखी काढण्यात आली. ढोल-ताशे आणि लेझीम पथकांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या वेळी महाडमधील काँग्रेसचे नेते हनुमंत जगताप यांच्यासह श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सुधीर थोरात, शिशिर दाते आदी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी देवीचे दर्शन घेतले.
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07703 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..