मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू
मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू

मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू

sakal_logo
By

महाड, ता. २२ (बातमीदार) : महाड शहरात राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चालवले जाते. यावर्षी वसतिगृहामध्ये २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांनी वसतिगृह कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास भटक्या जमाती, इत्यादी संवर्गात आठवीपासून आणि भंगी, मांग, गौड, कातकरी, माडिया इत्यादी जमातीमधील विद्यार्थिनींना पाचवीपासून विशेष प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. महाड येथील मागासवर्गीय मुलींच्या सरकारी वसतिगृहात शालेय ३०, अकरावी आणि बारावीच्या १५, वरिष्ठ महाविद्यालयाच्या १५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १५ विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य स्वरूपात उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी गृहपाल एस. के. सावंत ९४२३०९२८२२ यांच्याशी संपर्क साधावा.

आवश्‍यक कागदपत्रे
वसतिगृहात प्रवेश करण्यासाठी गुणपत्रिकेची झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड झेरॉक्स, विद्यार्थिनींचे दोन फोटो, तहसीलदाराकडील उत्पन्नाच्या दाखल्याचे झेरॉक्स, (उत्पन्न अट- एसी, एसटी २ लाख ५० हजार आणि इतर जातींच्या विद्यार्थिनींना एक लाख), एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनीसाठी जातीच्या दाखल्याची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स व बँक ऑफ इंडियाचे खाते क्रमांक ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

मिळणाऱ्या सुविधा
या वसतिगृहात विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य भत्ता ४ हजार, त्याचप्रमाणे दररोज दूध, नाश्ता, दोन वेळचे जेवण, आठवड्यातून दोन वेळा मांसाहार जेवण दिले जाते. तसेच बेडशीट, चादर, ब्लॅंकेट, ताट, वाटी, इत्यादी साहित्य पुरविले जाते. विद्यार्थिनींना गणवेशासाठी प्रतिवर्षी एक हजार, तर महाविद्यालयीन गणवेशासाठी दोन हजार दिले जातात. सायन्स शाखेसाठी ५०० रुपये विशेष भत्ता दिला जातो. छत्री, गमबूट खरेदी करण्यासाठी प्रतिवर्षी पाचशे रुपये दिले जातात. प्रतिमहा विद्यार्थिनीला ५०० रुपये निर्वाहभत्ता आणि साहित्य भत्ता १०० रुपये दिला जातो. तसेच वसतिगृहामार्फत शैक्षणिक सहल, वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. दैनंदिन योगासन वर्ग, साप्ताहिक समाजसेवा तासिका घेतली जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07704 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top