
बाजीराव चाफेकर यांचे निधन
महाड, ता. २६ (बातमीदार) : माणगाव तालुक्यातील बोरवाडीमधील ब्राह्मण समाजाचे तसेच विविध संस्थांचे मार्गदर्शक बाजीराव गोविंद चाफेकर (८६) यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथील गोरेगाव या निवासस्थानी रविवारी (ता. २२) निधन झाले. माणगाव तालुक्यातील बोरवाडी येथे जन्मलेल्या बाजीराव चाफेकर यांचे शालेय शिक्षण महाड शहरामध्ये झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे अनेक महत्त्वपूर्ण खासगी कंपन्यांमधून काम करताना महाड शहर, बोरवाडी येथील ब्राह्मण समाज तसेच विविध सामाजिक संस्थांना मार्गदर्शन केले. बोरवाडी येथे उभारलेल्या मातोश्री वृद्धाश्रम प्रकल्पांमध्येही त्यांनी मौलिक मदत केली. समाजातील तरुण-तरुणींनी शासकीय नोकरी व्यवसायावर अवलंबून न राहता उच्चशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करावे, यासाठी ते प्रयत्नशील होते. काही महिन्यांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडांसह धाकटा भाऊ आदी मोठा परिवार आहे.
................
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07717 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..