महागाईची झळ शाळेपर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाईची झळ शाळेपर्यंत
महागाईची झळ शाळेपर्यंत

महागाईची झळ शाळेपर्यंत

sakal_logo
By

सुनील पाटकर : सकाळ वृत्तसेवा
महाड, ता. २ : रायगड जिल्ह्यातील शाळा १३ जूनपासून सुरू होत आहे. कोरोना संकटातून बाहेर पडलेल्या पालक व विद्यार्थ्यांपुढे आता नवीन शैक्षणिक वर्षात वाढलेल्या शालेय साहित्यांच्या दरांचे संकट उभे राहिले आहे. यंदा शालेय साहित्यांचे दर ३०-३५ टक्के वाढले आहे. मागणी असूनही पुरवठाच होत नसल्याने बाजारात वह्यांची टंचाईसुद्धा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
टाळेबंदीमुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या. शाळा अनियमित असल्याने साहित्यांचा उठाव झाला नाही. नवीन शैक्षणिक वर्षात साहित्य तयार करण्यात उत्पादकही धजावले नाहीत. रशियातील युद्ध, इंधनाचे वाढलेले दर, कागद टंचाई याचा शालेय साहित्य दरवाढीवर परिणाम झाला आहे. पेन्सिलपासून लाँगबुकपर्यंत सर्वच किमती ३०-३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. दोन वर्षे काटकसर केलेल्या पालकांना यावर्षी साहित्य खरेदी करावी लागणार आहे. दप्तरे, नव्या वर्गाची पाठ्यपुस्तके, मोठ्या व लहान आकाराच्या वह्या, चित्रकला वही, प्रयोगवही, टिफिन, पेन-पेन्सिल, कंपास पेटी, पाण्याची बाटली, खोडरबर, टोकयंत्र, पुस्तके कव्हर, गम यांसारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालक व मुले दुकानांत गर्दी करत आहेत. जिल्ह्यातील सुमारे ६०० दुकाने शालेय साहित्यांनी सजली असली, तरी बाजारात वह्यांचा तुटवडा जाणवत आहे. मागणी करूनही दुकानदारांना पुरेसा पुरवठा होत नाही. कागद टंचाईमुळे आणि कमी उत्पादनामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यातच शैक्षणिक साहित्याचे दरही वाढत आहे. यामुळे पालकांचे बजेट कोलमडले आहे. महागाईची झळ आता शाळेपर्यंत पोहचल्याने मुलांना शिक्षण देणेही अवघड असल्याचे मानसी पाटील यांनी सांगितले.

या ब्रॅण्डचे साहित्य
३ रुपयांची पेन्सिल ५ रुपयांना, १० रुपयांचे पेन १५ रुपयांवर पोहचले आहे. लहान वह्यांच्या किमतीत डझनला ६० रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय कंपास आणि त्यातील साहित्य २५ टक्क्यांनी, तर दप्तरचे दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत. बाजारात सध्या डोम्स, नवनीत, कॅम्लिन, क्लासमेट, सुंदरम, सुदर्शन, अप्सरा, युवा, सम्राट या ब्रँडसह काही स्थानिक कंपनीची साहित्य उपलब्ध झाली आहेत.

टोळेबंदीमुळे दोन वर्षे व्यापारी आणि उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच जागतिक स्तरावर शाई व कागदाचे वाढलेले भाव, इंधन दरवाढ यामुळे शैक्षणिक साहित्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यातच वह्यांची टंचाईहीसुद्धा जाणवत आहे.
- अक्षय कदम, व्यापारी
.........
शालेय साहित्य दर (रुपयांत)
या वर्षीचे दर ... जुने दर
पेन्सिल (नग) .... ५ ते ८ ... ३ ते ५
१०० पानी वही (डझन).... ३०० ... २४०
ए४ वही (डझन)... ७२०-८०० ... ५५०-६००
कव्हर रोल (नग) .... ५० ... ३५
पेन (नग).... १५ ... १०
चित्रकला वही (नग) .... ३५ ... २५
.........

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07739 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top