सह्याद्रीवाडीतील शालेय मुलांना हक्काचे आंदण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सह्याद्रीवाडीतील शालेय मुलांना हक्काचे आंदण
सह्याद्रीवाडीतील शालेय मुलांना हक्काचे आंदण

सह्याद्रीवाडीतील शालेय मुलांना हक्काचे आंदण

sakal_logo
By

महाड, ता. २० (बातमीदार) : शाळेची पक्की इमारत नसल्याने झोपडीवजा शाळेत शिकणाऱ्या सह्याद्रीवाडीतील शाळेची मुले आता नव्या इमारतीत शिकू लागली आहेत. गिर्यारोहकांनी पुढाकार घेऊन उभारलेल्या या शाळेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.
या नव्या शाळेचे लोकार्पण चिखलगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व दापोली येथील ''लोकसाधना'' सेवा संस्थेचे संस्थापक डॉ. राजाभाऊ दांडेकर यांच्या हस्ते झाले. जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीत सह्याद्रीवाडीत दरड कोसळली होती. यात शाळेचे प्रचंड नुकसान झाल्याने आणि दरडीचा धोका असल्याने सह्याद्रीवाडीचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन झाले. शिक्षक रवींद्र जेधे यांनी ही शाळा जवळच असलेल्या एका झोपडीत भरवण्यास सुरुवात केली. ही बाब सह्याद्रीमित्र संस्थेच्या निदर्शनास आली. संस्थेच्या माध्यमातून त्वरित शाळेसाठी वर्ग बांधून देण्याचे काम अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने हाती घेतले. सहा महिन्यांतच या शाळेचे बांधकाम पूर्ण झाले. आता या नव्या शाळेत मुलांचे शिक्षण सुरू झाले.
याप्रसंगी गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्याध्यक्ष हृषिकेश यादव, ज्येष्ठ पदाधिकारी राजन बागवे, सह्याद्रीमित्र महाडचे डॉ. राहुल वारंगे, गटशिक्षणाधिकारी सुनीता पालकर, रायगड जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे अध्यक्ष धनंजय मदन, किरण देशमुख, राहुल मेश्राम, विश्वेश महाजन, खोपोली येथील यशवंती हायकर्सचे अध्यक्ष पद्माकर गायकवाड, सह्याद्रीमित्रचे शलाका वारंगे, अमोल वारंगे, संकेत शिंदे, भूषण शेठ आणि शाळेचे शिक्षक रवींद्र जेधे उपस्थित होते.
.....

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07796 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top