महाडमध्ये भाजपकडून योगाचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडमध्ये भाजपकडून योगाचे धडे
महाडमध्ये भाजपकडून योगाचे धडे

महाडमध्ये भाजपकडून योगाचे धडे

sakal_logo
By

महाड, ता. २३ (बातमीदार) : जागतिक योगदिनी महाड भाजपच्या वतीने २१ जूनला योग शिबिर झाले. या वेळी योगासनांचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच आरोग्य क्षेत्रातील नवोदित डॉक्टरांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
वीरेश्वर मंदिर सभागृहात झालेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनीही सहभाग घेतला होता. माधव डाकवे, शलाका वारंगे आणि गिरीष साळी यांनी योगासने आणि योगविषयी माहिती दिली. तसेच नवोदित डॉ. ऋषिकेश कुद्रीमोती, डॉ. सायली बुटाला, डॉ. सत्यम कळसकर, डॉ. ऋचा शहा, डॉ. ऋचा मिरगल, डॉ. श्रृती सलागरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला‌. तसेच उत्कृष्ट फोटोग्राफी पुरस्कार मिळालेले मित डाकवे यांनाही गौरवण्यात आले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, उपाध्यक्ष नाना महाले, संदीप ठोंबरे, निलीमा भोसले, मंजुषा कुद्रीमोती, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, सरचिटणीस महेश शिंदे, वाहतूक सेल अध्यक्ष नाना पोरे, शहराध्यक्ष नीलेश तळवटकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07805 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top