आपद्ग्रस्त गावांची खबरदारी घेणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपद्ग्रस्त गावांची खबरदारी घेणार
आपद्ग्रस्त गावांची खबरदारी घेणार

आपद्ग्रस्त गावांची खबरदारी घेणार

sakal_logo
By

महाड, ता. २२ (बातमीदार) : महाड तालुका हा आपद्‍ग्रस्त तालुका असल्याने पावसाळ्यात दरडग्रस्त व पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करावे लागते. या काळात ग्रामस्थ व स्थानिक प्रशासनाला येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्याप्रमाणे नियोजन करण्यासाठी तालुक्यातील दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना भेटी देण्याचा कार्यक्रम २१ ते २५ जून या कालावधीत करण्यात आला आहे. त्यानुसार ७२ दरडग्रस्त व २९ पूरग्रस्त गावांत उपाययोजना करण्यासाठी गावनिहाय पाहणी दौरा सुरू झाला आहे.
महाड तालुक्यात सातत्याने होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून ७२ गावे धोकादायक म्हणून घोषित झाली आहेत. गतवर्षी २२ जुलैच्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. त्यानंतर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, पुणे यांच्याकडून महाड तालुक्यातील दरडग्रस्त गावांचा अहवाल प्राप्त झालेला आहे. या गावनिहाय अहवालामध्ये काही शिफारशी सूचविलेल्या आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यानुसार ७२ दरडग्रस्त व २९ पूरग्रस्त गावांसाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी दरडग्रस्त गावांचा पाहणी दौरा जाहीर केला आहे. यासाठी गावनिहाय अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. हे अधिकारी मंगळवारपासून त्यांना नेमून दिलेल्या गावातील ग्रामस्थ व स्थानिक प्रशासनासह प्रत्यक्ष भेट घेत आहेत. त्‍यानंतर गावातील नैसर्गिक आपत्तीविषयक पूर्व खबरदारी व आपत्कालीन परिस्थितीत उद्‍भवणाऱ्या समस्या, करावयाच्या उपाययोजना इत्यादींबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला जाणार आहे.

ग्रामस्थ-स्थानिक प्रशासनात समन्वय राहील
महाड तालुक्यातील दरडग्रस्त व पूरग्रस्त गावात पुराचा व दरडीचा धोका उद्‍भवू नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात या गावांतील नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करावे लागणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या धोक्याच्या पूर्वसूचनेची गावपातळीवर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे या दरडग्रस्त व पूरग्रस्त गावाला भेटी दिल्यास गावातील ग्रामस्थ व स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय राहील आणि आपत्ती कालावधीत येणाऱ्या अडचणी समजून घेवून त्याप्रमाणे काटेकोरपणे नियोजन करणे सोयीस्कर होईल. यासाठी तालुक्यातील आपद्‍ग्रस्त गावांना भेटी देण्यासाठी दौरा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

...........

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07808 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top