आरोग्यवर्धक रानभाज्यांना मिळतेय प्रतिष्ठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यवर्धक रानभाज्यांना मिळतेय प्रतिष्ठा
आरोग्यवर्धक रानभाज्यांना मिळतेय प्रतिष्ठा

आरोग्यवर्धक रानभाज्यांना मिळतेय प्रतिष्ठा

sakal_logo
By

सुनील पाटकर, महाड
पावसाळ्यात एकदा तरी रानभाजी खायलाच हवी असा आग्रह घरातील ज्येष्ठांचा असतो. तर आहारतज्‍ज्ञही याला दुजोरा देत असतात. पावसाळ्यात रानात आढळणाऱ्या आरोग्यदायी आणि औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या यापूर्वी केवळ स्थानिक आणि गावागावांपुरत्या मर्यादित होत्या. परंतु, आता या रानभाज्यांना प्रतिष्ठा मिळू लागल्याने समाज माध्यमातून या भाज्या आणि त्यांची पाककृती घरोघरी पोहचल्या आहेत. लहानमोठ्या शहरातही ग्रामीण महिला अशा रानभाज्यांची विक्री करताना दिसत आहेत.

-----
पावसाळा सुरू झाला की, रानभाज्यांची उगवण होते. त्यांची वाढही लवकर होत असल्याने त्या बाजारात येऊ लागल्या आहे. या हंगामात एकदा तरी रानभाजी खावी, असा सूर घरोघरी असल्याने त्यांना चांगली मागणी असते. रानभाज्यांचे ज्ञान आदिवासी व स्थानिकांना असल्याने पावसाळ्यात त्‍या विक्रीसाठी आणतात. कोणतीही शेती व लागवड न करता रानात, बांधावर उगवणाऱ्या भाज्या म्हणजे रानभाज्या. गेल्या काही वर्षांत त्यांना प्रतिष्ठा मिळू लागल्याने त्याचा वापर व मागणी वाढू लागली आहे. राज्यात विविध ठिकाणी रानभाज्या महोत्सव आयोजित केला जातो. यामुळे या भाज्या परिचित झाल्या आहेत. कृषी विभागाने आपआपल्या भागातील रानभाज्यांची ओळख करून देणारी पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. यात सुमारे २५ रानभाज्यांची माहिती, त्यांची नावे, गुणधर्म आणि पाककृतीही दिल्याने महिलांना त्याचा उपयोग होत आहे. यापेक्षाही समाज माध्यमांवर रानभाज्या झळकू लागल्या आहेत. रानभाज्या कशा करायचा हा महिलांपुढील प्रश्नही समाज माध्यमांवर दाखवल्या जाणाऱ्या पाककृतीतून दूर झाला आहे.
काही आरोग्यविषयक संस्थांनी महिलांसाठी बक्षिसे देणाऱ्या पाककला स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. यालाही महिला वर्ग प्रतिसाद देत आहे. रानभाज्यांत असणारे औषधी गुणधर्म सर्दी, खोकला, दमा, पोटदुखी अशा अनेक आजारांवर या भाजा गुणकारी ठरल्या आहेत. रानभाज्यांना प्रतिष्ठा मिळाल्याने १५ ते २० रुपये जुडीने भाज्या विकल्या जात आहेत. या भाज्यात भारंगी, मायाळू, दिंडा, टाकळा यांना मागणी आहे. यातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगारही मिळत आहे.
..............
रानभाज्या
कंटोळी (कर्टुल)
कुरडू, टाकळा
करांदे, आंबट वेल, तालिमखाना,मायाळू
दिंडा, टेरी (आळू), कवळा, कुलू
भारंगी, वाघेटी, कंटोळी
.....
औषधी गुणधर्म
कर्टुल - रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी
बाफळी - पोटदुखी, जंत होणे
कुडा - मूळव्याध, रक्तस्राव, अतिसार, आमांश, अग्निमांद्य
कडमडवेली - कफप्रवृत्ती दूर होते.
आंबट चुका - पचनक्रियाही सुरळीत, हातापायांची जळजळ, मूत्रमार्गाचा दाह इ. उष्णतेच्या विकारात उपयोगी
आघाडा - हाडे बळकट, मूतखडा, मूळव्याध व पोटदुखीवर
टाकळा - वात व कफदोष व त्वचा विकारावर उपयुक्त. लहान मुलाच्या पोटातील कृमींवर
..........
स्टेटस म्हणून आजकाल आपण शरीराला हानिकारक गोष्टी खात आहोत. परंतु अनेक रानभाज्याही आरोग्याला पूरक अशा आहेत. त्याचे ज्ञान अवगत करून वापर केला पाहिजे.
- सुरेश जोशी, आहारतज्‍ज्ञ
.........
रानभाज्या गावातच विकल्या जात; परंतु आता त्यांची मागणी शहरातही वाढली आहे. भारंगी व टाकळा यांना मागणी असते.
- भागी काटकर, विक्रेती
..........

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07813 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..