
महाडकरांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
महाड, ता. ४ (बातमीदार) : महाड शहर व परिसर; तसेच औद्योगिक क्षेत्राला पुराचा सामना करावा लागतो. पूरपरिस्थिती व इतर आपत्तीवेळी मदतकार्याची मोठी गरज भासते. ही बाब लक्षात घेऊन महाड उत्पादक संघ सीईटीपी, महाड नगरपालिका आणि श्रृंखला संस्थेकडून २ जुलैला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह चवदार तळे येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली.
महादेव रोडगे यांनी पालिकेने केलेल्या पूर आपत्तीच्या व्यवस्थापनाची माहिती सर्वांना दिली. सीईटीपीच्या पथकाकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी पिडिलाइट कंपनीचे अधिकारी विजय मोटे आणि एमआयडीसी फायरबिग्रेडचे अमेय काळे व पथक यांनी पूरपरिस्थितीत आपण कशी काळजी घेऊन स्वतःचे लाईफ जॅकेट बनवू शकतो. आपत्तीकाळात घरातल्या जखमींना प्रथमोपचार कसे करावेत, याची माहिती दिली. तसेच उपस्थितांना घरगुती आग विझवण्याचे प्रात्यक्षिक दिले. यात महिलांनीही सहभाग घेतला. उपस्थित नागरिकांनी यावेळी विचारलेल्या विविध शंकाचे निरसन तज्ज्ञांकडून करण्यात आले. सीस्केप संस्थेचे प्रेमसागर मेस्त्री व प्रशांत रेस्क्यु टीमचे प्रशांत साळुके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सीईटीपीचे जयदीप काळे, निखिल भोसले, तसेच श्रृंखलाच्या ममता मेहता, विद्या देसाई, रूपाली बोंद्रे आणि उज्वला कोळेकर यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे ५० नागरिकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळेप्रसंगी दी अण्णासाहेब सावंत अर्बन बँकेच्या अध्यक्ष शोभा सावंत, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद, महाड नगरपालिका मुख्याधिकारी महादेव रोडगे, सीईटीपीचे व्यवस्थापक जयदीप काळे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश पाटेकर व सुनील अगरवाल उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07841 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..