अमित ठाकरेंचे महाडमध्ये स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित  ठाकरेंचे महाडमध्ये स्वागत
अमित ठाकरेंचे महाडमध्ये स्वागत

अमित ठाकरेंचे महाडमध्ये स्वागत

sakal_logo
By

महाड, ता.१० (बातमीदार) ः महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. महाड येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्‍ट्रीय स्मारक येथे महाड, पोलादपूर आणि माणगाव येथील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. कोकणातील मनविसेची जडणघडण व पुनर्बांधणी या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला होता.

या दौऱ्याच्या निमित्ताने अमित ठाकरे यांनी हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या गुरुकुल या महाविद्यालयाला भेट दिली. तेथील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांसह कॉम्प्युटर लॅब व रोबोटिक लॅबची पाहणी करून सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पुतळ्यास आणि चवदार तळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथील सभागृहात त्यांनी मुक्तांगण या गतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले. या वेळी अनेक तरुणांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला. अमित ठाकरे यांच्यासोबत मनविसे उपाध्यक्ष कीर्तीकुमार शिंदे, प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर, विद्यार्थी सेना दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे, तालुका सचिव तेजस गांधी, महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे, शहर उपाध्यक्ष दीपक चव्हाण, महिला शहराध्यक्षा प्रतीक्षा कुलकर्णी, शहर उपाध्यक्षा लावण्या शिगवण यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07860 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..