चांढवे खुर्द गावात दरड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांढवे खुर्द गावात दरड
चांढवे खुर्द गावात दरड

चांढवे खुर्द गावात दरड

sakal_logo
By

महाड, ता. १४ (बातमीदार) : महाडमध्ये गुरुवारी पावसाचा जोर थांबला असला, तरी महाडकरांना दोन वेळा पुराने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे महाडमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण आहे. कालच्या पावसामुळे तालुक्यामध्ये दोन घरांचे नुकसान झाले तर एका गावामध्ये दरड कोसळली. काही ठिकाणी रस्त्यांवर झाड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. प्रशासनाच्या तत्परतेमुळे जनजीवन सुरळीत सुरू आहे.
महाडमध्ये सावित्री व गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे शहरातील सखल भागात पुराचे पाणी साचले होते. पावसाचा जोर वाढत असल्याने प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद, पालिका मुख्याधिकारी महादेव रोडगे व पोलिस उपाधीक्षक नीलेश तांबे यांचे पथक पूर्ण रात्रभर पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. चांढवे खुर्द या गावांमध्ये तर दरड कोसळल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. मात्र, या घटनेत कोणतीही हानी घडली नाही. तेलंगे आणि रायगड छत्री निजामपूर मार्गावर मोठी झाडे कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. प्रशासन व स्थानिक नागरिकांकडून ही झाडे तत्काळ हलवण्यात आली. वराठी येथील सुरेश गोरीवले यांच्या घराचे पत्रे वाऱ्याने उडून गेल्याने नुकसान झाले आहे. आमडोशी येथील राजाराम देवजी हिलम यांच्या घरकुल नुकसान झाले आहे. महाडमध्ये आत्तापर्यंत दहा घरांचे नुकसान झाले असून टकमकवाडी येथील पांडुरंग डावले यांच्या बैलाचा अतिवृष्टीमध्ये मृत्यू झाला आहे.
गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरल्याने नदीची पातळीही खाली गेली आहे. तरी महाडकारांना दोन वेळा पुराने हुलकावणी दिल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. व्यापारी, तसेच नागरिकांनी आपले सामान आणि दुकानातील माल सुरक्षितस्थळी ठेवून दिला आहे.

१ हजार नागरिकांचे स्थलांतर
सद्यस्थितीमध्ये महाड तालुक्यातील २५ गावांमध्ये सुमारे १ हजार ८८ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. या ठिकाणी प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतीकडून स्थलांतरित नागरिकांना सुविधा दिल्या जात आहेत.
........

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07880 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..