महाडमध्ये १७५ दात्यांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडमध्ये १७५ दात्यांचे रक्तदान
महाडमध्ये १७५ दात्यांचे रक्तदान

महाडमध्ये १७५ दात्यांचे रक्तदान

sakal_logo
By

महाड, ता. १६ (बातमीदार) : रक्तदान चळवळ गतिमान करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी (ता. १५) महारक्तदान शिबिर घेतले होते. याला विक्रमी प्रतिसाद मिळत एकूण १७५ दात्यांनी रक्तदान केले. येथील ब्राम्हण सभा सभागृहात हे शिबिर पार पडले. शिबिरात ७१ जणांनी पहिल्यांदाच रक्तदान केले. त्यापैकी १८ महिलांचा समावेश आहे. शिबिरासाठी येथील जनकल्याण रक्तपेढी यांनी रक्तसंकलन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी संयोजक शरद गांगल, समीर गाडगीळ, प्रतीक जोशी, शेखर शिदोर; तसेच जनकल्याण रक्तपेढीच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.
....

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07952 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..