कांबळे केंद्रातील शाळांना शैक्षणिक साहित्यवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांबळे केंद्रातील शाळांना शैक्षणिक साहित्यवाटप
कांबळे केंद्रातील शाळांना शैक्षणिक साहित्यवाटप

कांबळे केंद्रातील शाळांना शैक्षणिक साहित्यवाटप

sakal_logo
By

महाड, ता. २१ (बातमीदार) : दिव्यांग ऐक्य शिक्षण व पुनर्वसन संस्था महाड आणि एकलव्य आधार प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने कांबळे केंद्रातील शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. चांढवे खुर्द शाळेत नुकताच हा कार्यक्रम पार पडला.
कांबळे केंद्रातील चांढवे खुर्द, चांढवे बु., शिंदेकोंड या शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप चांढवे खुर्द शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा खातु यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ''शिक्षण प्रवाह योजना'' २०२२ अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी दिव्यांग ऐक्य प्रशिक्षण व पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष नीलेश मोरे, सचिव अमोल गंगावणे, एकलव्य आधार प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष स्वप्नील प्रभू, सचिव ज्ञानदीप दळवी, खजिनदार सचिन नेरूरकर, चांढवे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका चाळके, कुसगाव शाळेचे मुख्याध्यापक सुधीर सकपाळ, न्यू इंग्लिश स्कूल चांढवेचे संस्थापक अध्यक्ष सोपान चाळके, ग्रामपंचायत सदस्या सोनाली शेलार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश चाळके, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कोंडवीलकर यांनी केले, तर आभार बालाजी गुबनरे यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07957 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..