अन्नप्रक्रिया उद्योगावर भर देण्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन्नप्रक्रिया उद्योगावर भर देण्याची गरज
अन्नप्रक्रिया उद्योगावर भर देण्याची गरज

अन्नप्रक्रिया उद्योगावर भर देण्याची गरज

sakal_logo
By

अन्नप्रक्रिया उद्योगावर भर देण्याची गरज
केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे प्रतिपादन

महाड, ता. २३ (बातमीदार) ः केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी रायगड लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यात महाडमध्ये नागरिक आणि विशेषतः लाभार्थ्यांशी संवाद साधत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली. अन्न प्रक्रिया उद्योगावर भर दिल्यास, उत्पादनात वाढ होऊन निर्यात क्षमता वाढेल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केले.
पटेल यांनी सोमवारपासून (ता. २२) संवाद दौरा सुरू केला असून मंगळवारी महाडला भेट दिली. सुरुवातीला त्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाड येथील राष्ट्रीय स्मारक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. या वेळी आंबेडकरी अनुयायांशी चर्चा करून केंद्रीय समाज कल्याण विभागाच्या योजना आणि राज्य शासनाच्या योजनांबाबत चर्चा केली. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी पुढे आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पटेल यांनी पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, किसान विमा योजनेतील लाभार्थ्यांना मिळालेल्या सुविधा, त्यांना येत असलेल्या अडचणी आणि तक्रारींचे निवारण केले. या योजनेतील त्रुटीही त्‍यांनी जाणून घेतल्या.
राज्य सरकारने केंद्राच्या योजना यशस्वीरीत्या राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी तळागाळातील नागरिकांना वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळेल, याची व्यवस्था करून गरजू व्यक्तीला किंवा कुटुंबाला योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी कार्य केले पाहिजे, असेही पटेल यांनी स्‍पष्‍ट केले.

मंगळवारी सकाळी रायगड किल्ल्यावर जाऊन मेघडंबरीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच रायगड किल्ल्यावर असलेल्या जगदीश्वराचे दर्शन घेतले.

महाड ः राष्ट्रीय स्मारकात नागरिकांची संवाद साधताना प्रल्हाद सिंह पटेल

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07974 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..