महिलेचे सोन्याचे दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेचे सोन्याचे दागिने लंपास
महिलेचे सोन्याचे दागिने लंपास

महिलेचे सोन्याचे दागिने लंपास

sakal_logo
By

महाड, ता. १९ (बातमीदार) : गणपतीसाठी हार व प्रसाद आणल्याचे सांगून चोरट्याने महाडमधील काजळपुरा येथील एका दुकानदार महिलेचे ७२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना ९ सप्टेंबरला सकाळी १०.३० च्या घडली असून, महिलेच्या तक्रारीवरून शुक्रवारी (ता. १६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रजनी राजाराम कदम (६२) यांचे काजळपुरा भागात किराणा मालाचे दुकान आहे. ९ सप्टेंबरला सकाळी १०.३०च्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती दुकानात आला. तुमच्या आळीतील सार्वजनिक गणपतीसाठी फुलांचा हार आणि प्रसाद आणला आहे. सध्या गणपती दर्शन बंद असल्याने तुम्ही हा हार व प्रसाद त्या ठिकाणी द्या, असा विश्वास त्याने संपादन केला. त्यानंतर तुम्ही तुमच्या गळ्यातील दागिने व हातातील अंगठी काढून या हाराला लावा म्हणजे तुमच्या दुकानाची भरभराट होईल, असे सांगितले. महिलेने आपले सर्व दागिने हाराला लावले असता अचानक डोळ्यांची आग होऊ लागली, याचा फायदा घेत त्याने ७२ हजारांचे दागिने लंपास करून पोबारा केला. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार महाड शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार एस. एस. दडस करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b08023 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..