विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकावर गुन्हा दाखल
विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकावर गुन्हा दाखल

विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

महाड, ता. ८ (बातमीदार) ः माध्यमिक शाळेत शिकत असणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या याच शाळेतील शिक्षकाविरोधात महाड औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड औद्योगिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळण येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील नववीत शिकत असलेली एक विद्यार्थिनी २० सप्टेंबरला शालेय पौष्टिक आहार दिनाच्या कार्यक्रमावेळी शिक्षक राजन बाबूराव महाडिक (वय ५७) याने हे कृत्य केले. ४ आॅक्टोबरपर्यंत त्याने असे प्रकार वारंवार केले. घडलेला हा सर्व प्रकार या मुलीने घरी आपल्या पालकांना सांगितल्यावर पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी महाड औद्योगिक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक एम. एस. आंधळे यांनी तपास करून शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
........