व्यावसायिकाची २४ लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यावसायिकाची २४ लाखांची फसवणूक
व्यावसायिकाची २४ लाखांची फसवणूक

व्यावसायिकाची २४ लाखांची फसवणूक

sakal_logo
By

महाड, ता. १७ (बातमीदार) : साबणाची एजन्सी देतो असे सांगून व्यापाऱ्याची २४ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चौघांविरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलादपूर तालुक्यातील वावे येथील उस्मान शेख हुसेन करबेलकर हे हॉटेल व्यावसायिक आहेत. एप्रिल महिन्यामध्ये त्यांना मोहम्मद शरीफ इब्राहिम काझी, मोहम्मद नायानी, जमीर मकानदार आणि अमीर रफिक शेख (सर्व रा. सांगली) हे चौघे पंचरत्न डिटर्जंट कंपनीच्या साबणाची एजन्सी देण्याकरिता भेटले होते. या सर्वांनी एजन्सी देण्याचे प्रलोभन दाखवत करबेलकर यांच्याकडून एप्रिल २०२२ ते १२ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये महाड येथील न्यू नटराज या हॉटेलमध्ये व्यवहार केला होता. यामध्ये या चौघांनी करबेलकर यांच्याकडून ११ लाख ४२ हजार ७५ रुपये रोख आणि आरटीजीएसद्वारे १२ लाख ९० हजार असे २४ लाख ३२ हजार ७५ रुपये उकळले. ही सर्व रक्कम ताब्यात घेऊनही करबेलकर यांना साबणाचा माल अथवा डिस्ट्रिब्युटरशिप मिळाली नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच करबेलकर यांनी महाड शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार या चौघांविरोधात महाड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे करत आहेत.