विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासूसासऱ्यावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासूसासऱ्यावर गुन्हा
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासूसासऱ्यावर गुन्हा

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासूसासऱ्यावर गुन्हा

sakal_logo
By

महाड, ता. २१ (बातमीदार) : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती, सासू व सासरा या तिघांवर महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील राजेवाडी बौद्धवाडी येथे ही घटना घडली.
मृत विवाहितेची आई वृषाली वाजेकर (रा.विन्हेरे) यांनी महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. मृत विवाहितेचे नाव प्रिया प्रतिश आर्डे (२३, रा. राजेवाडी बौद्धवाडी) असून तिचा प्रेमविवाह २०१७ मध्ये प्रतिश आर्डे (३१) याच्यासोबत झाला होता. लग्‍नानंतर प्रतिश व त्‍याच्या आईवडिलांनी प्रियाला माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावता होता. तिने पैसे न आणल्यामुळे त्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. अखेर छळाला कंटाळून प्रिया हिने १४ ऑक्टोबरला आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. प्रियाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती, सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.