महाडची डॉ. शैली कॅप्टन पदावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडची डॉ. शैली कॅप्टन पदावर
महाडची डॉ. शैली कॅप्टन पदावर

महाडची डॉ. शैली कॅप्टन पदावर

sakal_logo
By

महाडची डॉ. शैली कॅप्टन पदावर
महाड (बातमीदार) : भारतीय सैन्य दलात देशसेवा करण्याची कुटुंबाची परंपरा जपणाऱ्या महाड तालुक्यातील नागाव येथील डॉ. शैली सकपाळ यांची सैन्य दलाच्या वैद्यकीय विभागात कॅप्टनपदी निवड झाली आहे. तिच्या निवडीबद्दल नागाव ग्रामस्थांनी तिचा सत्कार करून कौतुक केले आहे. महाड तालुक्याला सैनिकी परंपरा आहे. या तालुक्यातील अनेक तरुण आजही सैन्यात सेवा बजावत आहेत. महाड तालुक्यातील नागाव येथील सकपाळ कुटुंबातही तीन पिढ्या देशसेवा करत आहेत. याच कुटुंबातील शैली हिची देखील एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर सैन्य दलातील मेडिकल कोर विभागात कॅप्टन पदावर निवड झाली आहे.