सात महिन्यात ७१५ जणांना दंश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सात महिन्यात ७१५ जणांना दंश
सात महिन्यात ७१५ जणांना दंश

सात महिन्यात ७१५ जणांना दंश

sakal_logo
By

महाड, ता. २२ (बातमीदार)ः तालुक्यातील ग्रामीण भागात श्‍वान, विंचू व सर्पदंशाचे प्रमाण वाढत असून सात महिन्यांत सुमारे ७१५ नागरिकांना या पशूंच्या दंशाचा सामना करावा लागला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांत दंश झालेल्‍या रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्‍याने मृत्यू रोखणे आरोग्य यंत्रणेला शक्य झाले आहे.
महाड हा डोंगराळ व दुर्गम तालुका असल्याने वन्यजीवांची संख्याही मोठी आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती व दुग्ध व्यवसाय केला जात असल्याने ग्रामस्थांना सातत्याने शेत व जंगल भागांमध्ये वावरावे लागते. परिणामी वेगवेगळ्या प्राण्यांच्या दंशाचा त्रास सहन करावा लागतो. शहरासह ग्रामीण भागातही भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढल्‍याने श्‍वानदंशाचे प्रमाणही वाढले आहे. रात्री-अपरात्री घरी परतणाऱ्या दुचाकीस्‍वारांच्या मागे कुत्रे लागल्‍याने अपघात झाल्‍याचे प्रकारही घडले आहेत.
तालुक्यामध्ये बिरवाडी, चिंभावे, दासगाव, पाचाड, विन्हेरे व वरंध ही सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सुमारे ७१५ नागरिकांना श्‍वान, सर्प व विंचू दंश झाल्‍याची नोंद आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये महाड तालुक्यामध्ये ४२० जणांना श्‍वान दंश, ५७ जणांना सर्पदंश तर १५२ जणांना विंचू दंश झाला आहे. याशिवाय ८५ जणांना इतर प्राणी चावल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना दंश झाल्‍यावर तातडीने प्राथमिक रुग्णालयात दाखल केले जाते. या ठिकाणी रेबीज लस तसेच इतर उपचार केले जात असल्‍याने अनेकांचे जीव वाचवण्यात यश आले आहे.

तालुक्‍यातील दंशाच्या घटना
आरोग्य केंद्र श्वान सर्प विंचू इतर

बिरवाडी २४७ २९ ७१ ३५

चिंभावे १२ २ ४ ५

दासगाव ४० ९ २२ ९

पाचाड ४१ ७ २४ २०

विन्हेरे ३९ १० ३० ९

वरंध ४१ ० १ ७

अधिकारी कोट नंतर पाठवतो.