कत्तलीसाठी आणलेली १४ जनावरे ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कत्तलीसाठी आणलेली १४ जनावरे ताब्यात
कत्तलीसाठी आणलेली १४ जनावरे ताब्यात

कत्तलीसाठी आणलेली १४ जनावरे ताब्यात

sakal_logo
By

महाड, ता. २ (बातमीदार) : तालुक्यातील चांढवे मोहल्ला येथे कत्तलीच्या उद्देशाने आणलेली १४ जनावरे महाड औद्योगिक पोलिसांनी ताब्यात घेतली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याठिकाणी मांसदेखील सापडल्याने कत्तल झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

महाड औद्योगिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांढवे गाव मोहल्ला येथे एका गोठ्यामध्ये कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या जनावरांची माहिती मिळाली होती. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता १४ जनावरे बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले. शिवाय एका घमेल्यात मांस आढळून आल्याने या गोठ्याच्या मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फैजुला फझल अंतुले (वय ३८), बशीर महमूद अंतुले (वय ६५), फझल अहमंद अब्दुला अंतुले (वय ६३) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गोठ्यात आठ गाई, तीन बैल, दोन म्हैशी, एक रेडा अशी चौदा जनावरे आणि चार सुरे, वजनकाटा, लाकडी ओंडका, मांसाने भरलेले घमेले असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस हवालदार नारायण तिडके यांनी महाड औद्योगिक पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार ताब्यात घेतलेल्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.