
महाडमध्ये २० ग्रामपंचायती बिनविरोध!
महाड, ता. ४ (बातमीदार) : तालुक्यात ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी सरपंच पदासाठी २१६ तर सदस्यपदांसाठी ९५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या पैकी २० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यांकरिता एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सात डिसेंबरनंतर उर्वरित चित्र स्पष्ट होणार आहे.
तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी दोन डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. दासगाव, नांदगाव बुद्रूक, नडगाव तर्फे बिरवाडी, लोअर तुडील, अप्पर तुडील, कांबळे तर्फे बिरवाडी, मोहप्रे, वहूर, रानवडी खुर्द, बीजघर, तळीये, बारसगाव, करंजाडी, शिरगाव, गांधारपाले, चिंभावे, ताम्हाणे, लाडवली, अंबवडे, शिरवली, वरंध, करंजखोल या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद लावली आहे.
नडगाव तर्फे बिरवाडी येथे सरपंचसाठी चार तर सदस्यांसाठी ५१ अर्ज दाखल झाले. नांदगाव बुद्रूक पाच, नाते चार, वाळसुरे चार, वाघोली चार, अप्पर तुडील ४, लोअर तुडील ५, कोल ५, कांबळेतर्फे बिरवाडी ९, वहुर ४, घावरे कोंड ४, रानवडी खुर्द, साकडी ५, कुसगाव ५, बीजघर ४, तळीये ५, बारसगाव ६, करंजाडी ४, लाडवली ५, जुई बुद्रूक ४, अंबवडे, शिरवली ६, वारंगी ४, वरंध ६, पारमाची ५ व करंजखोल ४ असे अर्ज सरपंचपदासाठी दाखल झाले आहेत.
तालुक्यातील ७३ पैकी २० ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता असून यात सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोंझर , पुनाडे तर्फे नाते, वाळण खुर्द, दादली, किंजलघर, नागाव, पिंपळवाडी रुपवली, आचलोली, मोहोत, निगडे, कुंबळे, दापोली, राजीवली, पाचाड, शिरसवणे, वडवली, केंबुर्ली, फाळकेवाडी, चांभारखिंड यांचा समावेश आहे.
सरपंचपदे राहणार रिक्त
महाड तालुक्यातील कुंबळे व फाळकेवाडी या दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. फाळकेवाडी येथील सरपंच पदाचे आरक्षण ओबीसीसाठी राखीव आहे. परंतु फाळकेवाडी गावामध्ये मराठा समाजाचे पूर्णपणे बहुमत असून व संपूर्ण वस्ती मराठा समाजाची असल्याने या ठिकाणी ओबीसी उमेदवार नसल्याने सरपंच पद हे रिक्त राहिले आहे. तर कुंबळे येथेही सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. परंतु येथेही उमेदवार नाही.
.......