मॅरेथॉनने क्रीडा महोत्‍सव सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॅरेथॉनने क्रीडा महोत्‍सव सुरू
मॅरेथॉनने क्रीडा महोत्‍सव सुरू

मॅरेथॉनने क्रीडा महोत्‍सव सुरू

sakal_logo
By

महाड, ता. १२ (बातमीदार) ः विद्यार्थी तसेच कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जिद्द, चिकाटी आणि ध्येय गाठण्याची भावना जोपासली जावी यासाठी महाड उत्पादक संघटना स्पोर्टस क्लब यांच्यामार्फत एम. एम. ए क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधील समर्थ रामदास विद्यालय मैदानात रविवारी मॅरेथॉन स्पर्धेने महोत्सवाची सुरुवात झाली.
महाडचे आमदार भरत गोगावले, महाड उत्पादन संघटनेचे अध्यक्ष संभाजी पठारे, एम.एम.ए सीईटीपीचे उपाध्यक्ष अशोक तलाठी, महेश पुरोहित, रमेश मालुसरे, बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.
मॅरेथॉनमध्ये पाच ते सात वर्षे गटांमध्ये मुलींमध्ये द्रोणा देवगिरकर, आस्मी खांबे, स्वामिनी गांगल व सृष्टी सालेकर यांनी पहिल्या चार क्रमांकात स्थान मिळविले तर याच वयोगटात मुलांमध्ये ऋतुराज राणे, लकी करे, श्रेयस कदम व पृथ्वीराज दळवी यांनी पहिले चार क्रमांक पटकावले. आठ ते दहा वर्षे वयोगटात मुलींमध्ये श्रावणी मोरे, जानवी खराडे, पूर्वा शिंदे आणि अवनी शिर्के यांनी पहिला चारमध्‍ये स्थान मिळवले तर याच वयोगटात मुलांमध्ये धैर्य जाधव, जागृत झांजे, वेदांत कदम, आदर्श दडस हे पहिल्या चारमध्ये स्‍थान आले. १८ ते ३५ वयोगटात मुलांमध्ये अजय बालगुडे, मनीष दुधाणे, अनिल वर्मा आणि तेजस पेंढारी यांनी अनुक्रमे पहिले चार क्रमांक पटकावले तर ३५ ते ५० वयोगटात समीर विचारे , उमेश धामणसे , अमोल वारंगे आणि योगेश भुवड हे पहिल्या चारमध्ये आले. पन्नास वर्षावरील गटात विनोद उतेकर, प्रमोद उतेकर, अरुण पवार आणि सतीश प्रतापपुरे हे पहिल्या चारमध्ये आले. महिलांमध्ये प्रियांका शिंदे व प्रियंका उतेकर यांनी यश प्राप्त केले.
महोत्‍सवात कॅरम, बुद्धीबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, कबड्डी, रस्सीखेच, क्रिकेट या खेळांचा समावेश आहे. विजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्र, पदक, चषक देण्यात आले.

महाड ः आमदार भरत गोगावले, संभाजी पठारे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला.