बेबलघरमध्ये रंगणार जाखडी नृत्य स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेबलघरमध्ये रंगणार जाखडी नृत्य स्पर्धा
बेबलघरमध्ये रंगणार जाखडी नृत्य स्पर्धा

बेबलघरमध्ये रंगणार जाखडी नृत्य स्पर्धा

sakal_logo
By

महाड, ता. १८ (बातमीदार) : कोकणातील प्रसिद्ध लोककला म्हणजे जाखडी नृत्य. याला शक्ती तुरा, बाल्यानाच असेही म्हणतात. या लोककलेचे जतन व्हावे, यात नव्याने येऊ पाहणाऱ्या युवा पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने कलगी तुरा समाज उन्नती, मुंबई मंडळाकडून महाड तालुक्यातील बेबलघर येथे २९ डिसेंबरला रात्री जिल्हास्तरीय जाखडी नृत्य स्पर्धा रंगणार आहे. स्‍पर्धेत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.
संत तुकाराम महाराज सभागृह, बेबलघर येथे होणाऱ्या स्पर्धेत प्रथम क्रमांकास ११ हजार १११, द्वितीय ५ हजार ५५५, तृतीय ३ हजार ३३३ रुपये व सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ढोलकी बक्षिस दिले जाणार आहे. उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट ढोलकीपटूसाठीही खास बक्षीसे आहेत. स्पर्धेत सहभागी सर्व कला पथकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ढोलकी देवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे मंडळाचे सरचिटणीस संतोष धारशे यांनी सांगितले.