महिलेच्या विनयभंगप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेच्या विनयभंगप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
महिलेच्या विनयभंगप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

महिलेच्या विनयभंगप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

महाड, ता. ७ (बातमीदार) : महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत विनयभंग झाल्याची तक्रारही पीडितेने दाखल केली आहे. महाड तालुक्यातील नरवण या गावी सोमवारी (ता. ६) पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलाचे काम करत होत्या. अयाच गावातील चंद्रभागा दासगावकर यांनी तिला शिवीगाळ केली. तसेच राजू दासगावकर यांनी फोनवरून तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. गुणाजी दासगावकर व शांताराम दासगावकर यांनी तिला शिवीगाळ केली. शिवाय त्यांनी या घरकुलाचे काम करणाऱ्या मजुरांना काम करण्यास अटकाव केला व त्यांनाही धमकी दिली. ती महिला तक्रार देण्याकरता रिक्षेतून जात असताना वाहन अडवण्यात आले. या प्रकरणी विनयभंग झाल्याची तक्रार तिने दाखल केली. या तक्रारीनुसार महाड तालुका पोलिस ठाण्यामध्ये विनयभंग व शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.