भीमसैनिकांना मिळणार शुद्ध पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमसैनिकांना मिळणार शुद्ध पाणी
भीमसैनिकांना मिळणार शुद्ध पाणी

भीमसैनिकांना मिळणार शुद्ध पाणी

sakal_logo
By

महाड, ता.१९ (बातमीदार) : चवदार तळे येथे दहा लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आरो जल शुद्धीकरण यंत्रणेमुळे भीमसैनिक व पर्यटकांना आता शुद्ध पाणी मिळणार आहे. आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी त्‍याचे उद्‌घाटन करण्यात आले.
चवदार तळे येथे दरवर्षी लाखो पर्यटक व अनुयायी भेट देत असतात. चवदार तळ्याचे पाणी तीर्थ म्हणून अनेकजण प्राशन करतात तसेच सोबतही घेऊन जातात. हे पाणी शुद्ध असावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. महाड नगरपालिकेने चवदार तळ्यावर जलशुद्धीकरण यंत्रणा बसविली आहे. त्याद्वारे दररोज ताशी दोन हजार लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. गोगावले यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर तलावातील पाण्याच्या शुद्धीकरण यंत्रणेप्रमाणेच चवदार तळे येथील पाणी देखील शुद्ध करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले आहे. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, अभियंता परेश साळवी, शिवसेनेचे शहर संपर्कप्रमुख सिद्धेश पाटेकर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष मोहन खांबे, शहरप्रमुख नितीन पावले, माजी सभापती सपना मालुसरे, महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई उपस्थित होते. शनिवारपासूनच शुद्धीकरण केलेले पाणी भीमसैनिकांना उपलब्ध झाले असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.