डॉ. आंबेडकर राष्‍ट्रीय स्मारकात कवितेचे जतन

डॉ. आंबेडकर राष्‍ट्रीय स्मारकात कवितेचे जतन

महाड, ता. २२ (बातमीदार) : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी हक्कासाठी लढा दिलेला चवदार तळे सत्याग्रह आजही प्रेरणादायी आहे. पाण्याचा हा संघर्ष कवितेच्या माध्यमातून चाळीस वर्षे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला गेला आहे. दहावीच्या अभ्यासक्रमात असलेली अनेक पिढ्यांना ऊर्जा देणारी ‘तू झालास मूकसमाजाचा नायक’ ही कविता आता महाड येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर राष्‍ट्रीय स्मारकात कायमस्वरूपी लावण्यात आली आहे. कवितेच्या फलकाचे अनावरण कवी ज. वि. पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला ९६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दलित पँथरचे संस्थापक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक लेखक, कवी ज. वि. पवार लिखित कविता ‘तू झालास मूकसमाजाचा नायक’ या कवितेचे अनावरण करण्यात आले. या वेळी समाजकल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाजकल्याणचे सहसचिव दिनेश डिंगळे, लेखक ज. वि. पवार, समाज कल्याण आयुक्त बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्रादेशिक उपायुक्त वंदाना कोचुरे, भंदत राहुल बोधीपालो, महाथेरो बार्टी संस्थेच्या निबंधक इंदिरा अस्वार, विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, नंदिनी आवडे, स्नेहल भोसले, वृषाली शिंदे, रवींद्र कदम, अनिल कांरडे आदी उपस्थित होते.
ज. वि. पवार यांच्या आंबेडकरी चळवळ व सामाजिक चळवळीतील योगदानाबदल बार्टी संस्थेच्या वतीने सुनील वारे यांचा हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, पुष्पगुच्छ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

देशातील अस्पृश्य समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंडळ, न्यायव्यवस्था व सामाजिक चळवळीत संघर्ष करून वंचित समूहाला मानवी मूलभूत हक्क मिळवून दिले. चवदार तळ्याचे पाणी चळवळीला कायम प्रेरणा आणि ऊर्जा देत राहील. बार्टीमार्फत चवदार तळे सत्याग्रहाच्या लढ्याची नव्याने मांडणी करून इतिहासाचे लिखाण जनतेसमोर आणले जाईल.
- सुनील वारे, बार्टीचे महासंचालक

महाड ः कविता फलकाच्या अनावरणप्रसंगी ज.वि. पवार, सुनील वारे, डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्‍थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com