
महाडमध्ये शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध
महाड, ता. २८ (बातमीदार) : महाड तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीला बारा जागा तर शिंदे गटाला अवघ्या तीन जागा मिळाल्या आहेत. शेतकरी संघावर अनेक वर्ष काँग्रेसचे वर्चस्व आहे. या वेळीही काँग्रेस महाविकास आघाडीकडून बहुतांशी सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेसचे रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत जगताप यांच्यासह, तालुका अध्यक्ष राजेंद्र कोरपे, अध्यक्ष अनंत देशमुख, महेश महाडीक, अनिल बेल, संदेश गोठल, धोंडीराम डोंबे, आत्माराम लाड, शंकर महाडीक, आर.एन. देशमुख, नथुराम धामणे व भारती अजित भोसले हे संचालक बिनविरोध निवडून आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीधर सकपाळ, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष धनंजय देशमुख, जगदीश पवार, प्रीती कालगुडे, लाडवली सरपंच मुबिना ढोकले, निसार ढोकले, विनोद भोसले, प्रशांत कालगुडे, रोहित पोरे, भूपेश पाटील, महेश शेडगे, किसन पवार, वेदांत मोरे यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
......
फोटो -विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना