दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

महाड, ता. २४ (बातमीदार) : रस्त्यालगत असलेल्या चेंबरला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २४) पहाटे घडली. यात आणखी एक जण जखमी झाला आहे. मुंबई - गोवा महामार्गावर महाडजवळील नडगाव गावच्या हद्दीत ही घटना घडली. मृत दुचाकीस्वाराचे नाव अजिंक्य शंकर पवार (वय २३) असे आहे.

अजिंक्य पवार आणि आतिश मोहिते हे दोघे चांभारखिंड येथून टेमघरकडे जात होते. दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेच्या चेंबरला जाऊन धडकली. रस्त्यावर पडल्याने आतिश जखमी झाला, तर चेंबरमध्ये वीस फूट खोल पडल्याने अजिंक्यचा जागीच मृत्यू झाला. महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com