शिवराज्याभिषेक सोहळ्याची रायगडावर पूर्वतयारी

शिवराज्याभिषेक सोहळ्याची रायगडावर पूर्वतयारी

महाड, ता. २५ (बातमीदार) : रायगड किल्ल्यावर ६ जून रोजी साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त प्रशासनातर्फे पूर्वतयारी केली जात आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावर भेट दिली. या वेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी आवश्यक सूचना दिल्या.

६ जून रोजी रायगड किल्ल्यावर साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने रायगडावर नेहमीपेक्षा अधिक संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रशासनामार्फत या सोहळ्याची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. रायगडावर सुरू असणाऱ्या पूर्वतयारीची पाहणी २४ एप्रिलला संभाजीराजे यांच्याकडून करण्यात आली. या वेळी रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमींच्या निवाऱ्यासाठी एमटीडीसी तसेच गडावरील जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेत व्यवस्था केली जाणार आहे. तेथे आवश्यक ती कामे सुरू करण्यात आली आहेत. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथेही शिवप्रेमींच्या निवाऱ्यांची सोय केली जाणार आहे. पाचाड येथील धर्मशाळेची पाहणीदेखील यावेळी करण्यात आली. राज्याभिषेकाला शिवप्रेमींची संख्या वाढणार असल्याचे गृहीत धरून राजदरबारामध्ये मंडप नेहमीपेक्षा मोठा तयार केला जाणार आहे. ही सर्व कामे वेगाने सुरू असून शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत बहुसंख्य कामे मार्गे लागतील, असा विश्वास संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केला. या पाहणीच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच रायगड प्राधिकरण विभागाचे अभियंता अविनाश बोरले व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com