महाडमध्ये अग्निशमन दलाला सुरक्षा साधनांचे वाटप

महाडमध्ये अग्निशमन दलाला सुरक्षा साधनांचे वाटप

महाडमध्ये अग्निशमन दलाला सुरक्षा साधनांचे वाटप
महाड (बातमीदार) : नगरपालिकेतील अग्निशमन दलाला महाड उत्पादक संघाच्या सामूहिक सांडपाणी प्रकल्प केंद्रामार्फत (सीईटीपी) नुकतेच अत्यावश्यक व सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. यात आगीपासून बचाव करण्यासाठी असलेले दोन सूट, हेल्मेट, हातमोजे सेफ्टी बेल्ट, सेफ्टी शूज तसेच इतर साधनांचा समावेश आहे. या साधनांचे वाटप महाड नगरपालिकेमध्ये करण्यात आले. यावेळी महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, सीईटीपीचे उपाध्यक्ष अशोक तलाठी, व्यवस्थापक तुषार भोसले, निखिल भोसले, नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणेश पाटील, गोविंद साळुंखे तसेच अग्‍निशमन दलातील अधिकारी उपस्थित होते.


महाड ः सुरक्षा साधनांचे वाटप करताना अशोक तलाठी, मुख्याधिकारी महादेव रोडगे उपस्‍थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com