महाडमध्ये फटाके वाजवून निर्णयाचे केले स्वागत

महाडमध्ये फटाके वाजवून निर्णयाचे केले स्वागत

महाड, ता. ११ (बातमीदार) : सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होताच गुरुवारी (ता. ११) शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महाड शहरांमध्ये फटाके वाजवून आनंद साजरा केला. गेले अनेक दिवस ज्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते, त्या सत्तासंघर्षाच्या निकालाची गुरुवारी घोषणा झाली. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या निर्णयाने सरकार वाचले याचा आनंद शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी व्यक्त केला.
महाड शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवसैनिकांनी फटाके फोडून व घोषणाबाजी करत आनंद साजरा केला. या वेळी तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, विजय सावंत, सिद्धेश पाटेकर, महिला शहर आघाडी प्रमुख विद्या देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आपले प्रतोद पद न्यायालयाने अवैध ठरवल्याने याबाबत न्यायालयाच्या निर्णयाचा आपण सन्मान करत असल्याचे सांगत सरकारबाबतचा निर्णय आमच्याच बाजूने लागणार असा विश्वासही आपल्याला होता, अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com