
दक्षिण मुंबईत दुसऱ्या दिवशीही बत्ती गुल
मुंबई, ता. २७ : पडघा येथील ४०० केव्ही ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली भागातील वीजपुरवठा मंगळवारी (ता. २६) खंडित झाला होता. साधारणतः दीड तासानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मुंबईतील ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा बंद झाला. अगदी पहाटेच्या सुमारास बत्ती गुल झाल्याने काही भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.
मुंबईतील ११ केव्ही ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने मुंबादेवीसह दक्षिण मुंबईतील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. अगदी पहाटेच वीज गेल्याने अनेकांची उकाड्यामुळे झोपमोड झाली. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणाही ठप्प पडल्याने परिसरातील पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला. शहरातील पाणीपुरवठ्यावर फारसा परिणाम झाला नसला तरी पूर्व उपनगरे ४० टक्के, तर पश्चिम उपनगरात २५ टक्के कमी पाणीपुरवठा झाला आहे. अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05894 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..