मध्य रेल्वेकडून ५७४ उन्हाळी विशेष एक्स्प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेकडून ५७४ उन्हाळी विशेष एक्स्प्रेस
मध्य रेल्वेकडून ५७४ उन्हाळी विशेष एक्स्प्रेस

मध्य रेल्वेकडून ५७४ उन्हाळी विशेष एक्स्प्रेस

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : उन्हाळी सुटीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पुणे, नागपूर या स्थानकातून देशभरात ५७४ उन्हाळी विशेष एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेने एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विविध ठिकाणी ५७४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यात सीएसएमटी आणि मनमाड/ नागपूर/ मालदा / रीवा दरम्यान १२६, दादर आणि मडगाव दरम्यान सहा, एलटीटी आणि शालिमार/ बलिया/ गोरखपूर/ समस्तीपूर/ थिविदरम्यान २८२, तर पनवेल आणि करमळीदरम्यान १८ उन्हाळी विशेष रेल्वे सोडल्या जाणार आहेत.
नागपूर आणि मडगावदरम्यान २०, पुणे आणि करमळी/ जयपूर/ दानापूर/ वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन/ कानपूर सेंट्रलदरम्यान १००, साईनगर शिर्डी आणि ढेहर का बालाजीदरम्यान २०, लातूर आणि बिदरदरम्यान दोन उन्हाळी विशेष रेल्वे धावणार आहेत. या सर्व उन्हाळी विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05895 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top