चार मागासवर्गीय महामंडळांच्या भागभांडवलात दुपटीने वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार मागासवर्गीय महामंडळांच्या भागभांडवलात दुपटीने वाढ
चार मागासवर्गीय महामंडळांच्या भागभांडवलात दुपटीने वाढ

चार मागासवर्गीय महामंडळांच्या भागभांडवलात दुपटीने वाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महामंडळांच्या भागभांडवलात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे महामंडळातील कर्जवितरण आदी कामकाज सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा पूर्वी ५०० कोटी होती. ती वाढवून एक हजार कोटी करण्यात आली आहे. त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा ३०० कोटींवरून एक हजार कोटी करण्यात आली आहे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची मर्यादा पूर्वी ७३.२१ कोटी होती, तीही वाढवून एक हजार कोटी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा ५० कोटींवरून ५०० कोटी करण्यात आली आहे. त्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यास मोठे यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.
चारही महामंडळांचे भागभांडवल मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे. त्यामुळे अनुसूचित जातीतील घटकांसह या महामंडळांच्या लाभार्थी घटकांना कर्जवाटप, रोजगार व स्वयंरोजगारांच्या वाढीव संधी, दीर्घ मुदत कर्ज योजना, कैशल्य विकासाच्या विविध योजना राबवण्यात येऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यात मोठा हातभार लागेल, असेही मुंडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05931 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top