
किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी आयुक्तांचे ‘सीआयएसएफ’ना पत्र
मुंबई, ता. २८ : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी सीआयएसएफच्या महासंचालकांना पत्र पाठवले आहे. सोमय्या यांच्यावर हल्ला झाला त्या वेळी सीआयएसएफ सुरक्षा यंत्रणा काय करत होती याची चौकशी करा, अशी सूचना संजय पांडे यांनी महासंचालकांना केली आहे.
किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिस आयुक्तांवर गंभीर आरोप केल्यानंतर, तसेच या प्रकरणी विविध चर्चांना उधाण आल्यानंतर अखेर संजय पांडे यांनी सीआयएसएफच्या महासंचालकांना पत्र पाठवले आहे. सोमय्या यांना केंद्राची झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. अशा वेळी त्यांच्यावर हल्ला होताना सीआयएसएफचे जवान कुठे होते याची चौकशी करावी, अशा आशयाचे पत्र संजय पांडे यांनी लिहिले आहे. किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. असे असताना त्यांच्यावर हल्ला कसा झाला? हल्ला झाला तेव्हा सीआयएसएफचे जवान कुठे गेले होते? याची चौकशी करावी, अशी सूचना संजय पांडे यांनी पत्राद्वारे महासंचालकांना केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05938 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..