अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सात कोटींची मालमत्ता जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सात कोटींची मालमत्ता जप्त
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सात कोटींची मालमत्ता जप्त

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सात कोटींची मालमत्ता जप्त

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आज मोठी कारवाई केली. ईडीने सुकेश चंद्रशेखर मनी लॉण्डरिंग प्रकरणात जॅकलिनची सात कोटी २७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात जॅकलिनच्या ७.१२ कोटी रुपयांच्या मुदत ठेवींचाही समावेश आहे. ईडीने तिच्या सात कोटींच्या भेटवस्तू आणि मालमत्ता जप्त केली आहे. आरोपी सुकेशने तिला त्या दिल्या होत्या.

सुकेशने जॅकलिनला १० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या महागड्या भेटवस्तू पाठवल्याचे आरोपपत्रात समोर आले होते. तसेच त्याने जॅकलिनच्या कुटुंबियांना एक लाख ७३ हजार डॉलर आणि जवळपास २७ हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची आर्थिक मदत केली होती. सध्या आरोपी सुकेश राजकीय नेते टीटीव्ही दिनकरन यांच्या पाच वर्षे जुन्या एका फसवणुकीच्या प्रकरणात अडकला आहे. ४ एप्रिलला त्याला ईडीने अटक केली आहे. मागील वर्षी गृह मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून २१५ कोटी रुपये उकळल्याप्रकरणी सुकेशला ईडीने अटक केली होती. डिसेंबर २०२१ मध्ये जॅकलिनला सुकेशविरुद्धच्या तपासात चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर ती ईडीसमोर हजर झाली.

दरम्यान, जॅकलिनसोबत बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर, नोरा फतेही आदींनाही या प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05962 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top