कंत्राटीकरणावरून परिचारिका आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राटीकरणावरून परिचारिका आक्रमक
कंत्राटीकरणावरून परिचारिका आक्रमक

कंत्राटीकरणावरून परिचारिका आक्रमक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : जगभरात आलेल्या कोविड महामारीत डॉक्टरांसह परिचारिकांनी झोकून काम केले; मात्र अजूनही परिचारिकांना त्यांचा हक्क मिळालेला नाही. गेल्या अनेक वर्षांत नवी पदभरती न झाल्याने परिचारिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. १३ एप्रिलला सरकारने परिपत्रक जारी करत बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच खासगी पद्धतीने (कंत्राटी) पदे भरण्यास मान्यता दिली आहे; मात्र आता याला परिचारिकांकडून विरोध होत आहे. रिक्त पदे सरळ सेवेद्वारे भरण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे.

खासगीकरणास विरोध दर्शवण्यासाठी जे. जे. रुग्णालयातील सर्व संवर्गांतील संघटनांनी २९ एप्रिलला गेट मिटिंग आयोजित केली होती. या वेळी खासगीकरणाच्या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. कोरोना काळात नियमित सेवेत रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा दिली. हीच परिस्थिती भविष्यात उद्‍भवली तर कंत्राटी कर्मचारी त्याच निष्ठेने काम करतील का, असा सवाल कर्मचारी संघटनांनी उपस्थित केला आहे. हे कंत्राटीकरण बंद झाले पाहिजे, या कंत्राटी भरतीमुळे आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असेही संघटनांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालये तसेच संलग्नित रुग्णालयांतील चार हजार ४४५ पदांवरील सेवा भरती बाह्य स्रोताद्वारे (कंत्राटी) भरण्यास सरकारने १३ एप्रिलला परिपत्रक जारी करत मान्यता दिली. या बाह्य स्रोताद्वारे भरती करण्याच्या निर्णयाला परिचारिका वर्गाने तीव्र विरोध केला आहे. ही रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात यावीत, अशी मागणी परिचारिकांमार्फत करण्यात येत आहे.

अन्याय दूर करावा!
बाह्यस्रोत पद्धतीने परिचारिकांची ही पदे भरण्याचा सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. सरकारला आमची विनंती आहे, की त्यांनी परिचारिका वर्गांची भरती ही सरळ सेवेमार्फत करावी. आमच्या जागा लवकरात लवकर सरळ सेवेने भरण्यात याव्यात आणि आमच्यावर होणारा हा अन्याय दूर करावा, असे मत राज्य परिचारिका संघटनेच्या हेमलता गजबे यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05967 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top