
एसटी बँक निवडणूक लांबणीवर पडणार?
मुंबई : एसटी बँकेच्या निवडणुकीची घोषणा झाली, मात्र बँकेचे मतदार असलेले एसटी कर्मचारी संपावर गेल्याने त्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. सहकारी संस्था अधिनियमानुसार थकबाकीदारांना मतदानाचा अधिकार नसल्याने बँकेची निवडणूक अडचणीत सापडली. या मतदारांच्या याद्या तयार करताना फक्त ३० टक्केच मतदार मतदानास पात्र ठरत होते. त्यामुळे अखेर बँकेच्या प्रशासनाने निवडणूक प्राधिकरणास निवडणूक पुढे ढकलण्यासाठी पत्र पाठवले आहे.
एसटी बँकेच्या ५० शाखा मिळून एकूण ९० हजार सभासद आहेत. त्यापैकी सध्या फक्त २५ ते ३० हजार सभासद मतदानास पात्र आहेत. परिणामी, सर्वाधिक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती असल्याची बाब एसटी बँकेने निवडणकू प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिली आहे. ज्यामध्ये निवडणुकीत जास्तीत जास्त सभासदांना भाग घेता यावा, त्यासाठीच्या उपाययोजनासुद्धा सुचवल्या गेल्या आहेत. सध्या राज्यभरात एसटी बँक सभासदांच्या मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच या याद्या पूर्ण होतील, मात्र सर्व सभासदांना मतदान करता येणार नसल्याने एसटी बँकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05968 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..