ॲड. जयश्री पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayashree Patil granted pre-arrest bail
ॲड. जयश्री पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर

ॲड. जयश्री पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या ॲड. जयश्री पाटील यांना शनिवारी अटकपूर्व जामीन मंजूर करून सत्र न्यायालयाने दिलासा दिला. जयश्री पाटील यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर करत पोलिस चौकशीस सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी जयश्री पाटील यांच्यावर गंभीर आरोप ठेवले असून सिल्वर ओकवर हल्ला करण्याचे कारस्थान रचण्यासाठी आयोजित बैठकीत जयश्री पाटील उपस्थित होत्या, असा दावा करण्यात आला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देण्याचा आरोपही पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. जयश्री पाटील यांचे पती ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी १८ दिवस अटकेत ठेवले होते. नुकताच सदावर्ते यांना जामीन मंजूर झाला असून ते कारागृहाबाहेर आले आहेत. मराठा आरक्षण प्रकरणातदेखील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05973 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top