हुतात्म्यांच्या वारसांची पेन्शनसाठी परवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pension
हुतात्म्यांच्या वारसांची पेन्शनसाठी परवड

हुतात्म्यांच्या वारसांची पेन्शनसाठी परवड

मुंबई - संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जण हुतात्मे झाले, त्यानंतर सत्याग्रह आणि विविध आंदोलनांमध्ये हुतात्म्यांची संख्या वाढली. मात्र अनेक हुतात्मांचे वारस राज्य सरकारच्या पेन्शनपासून अद्यापि वंचित असल्याचे चित्र आहे. जाचक सरकारी अटींमुळे पेन्शन मिळवण्यात अडचणी येत असल्याचे वारसांचे म्हणणे आहे. १७ जानेवारी १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्मे झाले होते. त्यापैकी पाच हुतात्मे बेळगावातील होते. यामध्ये मारुती बेन्नाळकर, मधु बांदेकर, लक्ष्मण गावडे, कमळाबाई मोहिते, महादेव बारीगडी या हुतात्म्यांचा समावेश होता; तर त्यानंतरच्या सत्याग्रहाच्या चळवळीत कारावास भोगत असताना नागप्पा होसुरकर, बाळू मिलजकर, गोपाळ चौगुले या तिघांचा तुरुंगातच मृत्यू झाला होता. मात्र यातील कमळाबाई मोहिते, गोपाळ चौगुले, लक्ष्मण गावडे, महादेव बारीगडी यांच्या वारसांना अद्यापही पेन्शन मिळाली नाही.

पुरुष असल्यास त्यांच्या आई-वडील आणि पत्नीला पेन्शन दिली जाते. मात्र, त्यानंतर मुलांना त्याचा लाभ मिळत नाही; तर महिला हुतात्मा असल्यास त्यांच्या पती आणि आई-वडिलांनाही पेन्शन दिली जात नाही. या अडचणीमुळे हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची पेन्शनसाठी ६६ वर्षांनंतरही परवड सुरूच आहे. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती प्रयत्न करत असल्याचे माजी महापौर आष्टेकर यांनी ‘सकाळ''ला सांगितले.

बँकेच्या तांत्रिक कारणामुळे पेन्शन हरवली!
मारुती बेन्नाळकरांची पेन्शन बँकेतून होत होती. मात्र, काही वर्षांपूर्वी युनियन बँकेचे दुसऱ्या बँकेत विलीनीकरण झाल्याने अचानक पेन्शन मिळणे बंद झाले. ही बाब राज्य सरकारच्या निदर्शनात आणून देऊनही अद्याप पेन्शन मिळाली नाही. त्यामुळे मारुती बेन्नाळकरांच्या ९२ वर्षांच्या पत्नीला वर्षभरापासून सरकारी पेन्शनची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05974 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top