
मुंबईत दिवसभरात ९४ कोरोनाबाधित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई महापालिका क्षेत्रात ९३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आता मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १,०५९,८२२ झाली आहे. तसेच एका रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५६३ वर स्थिर आहे.
शहर उपनगरात सध्या ६०९ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण १,०३९,६५० रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. दिवसभरात निदान झालेल्या रुग्णांपैकी ८८ रुग्ण लक्षणविरहित असून सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली आहे. शहर उपनगरातील २६ हजार ४४ खाटांपैकी केवळ १६ खाटांवर रुग्ण दाखल आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८,७६९ दिवसांवर येऊन ठेपला आहे; तर ६ एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.००७ टक्क्यांवर आहे. पालिकेने मागील २४ तासात रुग्णांच्या संपर्कातील एकूण ७७२ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. मुंबईत एकूण १,०५९,८२२ कोरोना बाधित असून मृतांची संख्या १९ हजार ५६३ इतकी आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05975 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..