वरळीची मुंबई पब्लिक इंग्लिश स्कूल अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरळीची मुंबई पब्लिक इंग्लिश स्कूल अव्वल
वरळीची मुंबई पब्लिक इंग्लिश स्कूल अव्वल

वरळीची मुंबई पब्लिक इंग्लिश स्कूल अव्वल

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधांसाठी मागील वर्षी देशातील पहिल्या १० आणि राज्यातील सरकारी शाळांच्या यादीत पहिले स्थान मिळवलेल्या वरळी सीफेस मुंबई पब्लिक इंग्लिश स्कूलने यंदा प्रवेशाचा नवीन विक्रम केला आहे. या शाळेत बालवाडी ते दहावीपर्यंतच्या सर्व वर्गात प्रवेश फुल्ल झाले आहेत. आपल्या पाल्यांना येथे प्रवेश मिळावा, यासाठी आस लावून बसलेल्या असंख्य पालकांना आता पुढील वर्षात पुन्हा प्रयत्न करावा लागणार आहे.
मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून वरळी सीफेस मुंबई पब्लिक इंग्लिश स्कूल चालवले जाते. या शाळेने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळेमध्ये अनेक अनोखे प्रयोग केल्याने मागील वर्षी ती राज्यात चर्चेचा विषय बनली होती. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लास, डिजिटल क्लास, ग्रंथालय कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, लघू विज्ञान केंद्र, संगणक कक्ष, हस्तकला कक्ष, चित्र कक्ष, संगीत कक्ष, शारीरिक शिक्षण कक्ष, टिंकरिंग लॅब आणि खगोलशास्त्र कक्ष अशा सुविधा दिल्या जातात. विद्यार्थ्यांना टॅब, शालोपयोगी वस्तू, गणवेश, पोषण आहार, शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाते. मुलींची शाळांमध्ये उपस्थिती लक्षणीय असून त्यांना खास असा उपस्थिती भत्ता दिला जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. विविध खेळ आणि उपक्रमांद्वारे शिक्षण आनंदाने दिले जात असल्याने विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री केरकर यांनी सांगितले. शाळेत बालवाडी ते १० वीपर्यंतचे वर्ग आहेत. त्यात १,५८० विद्यार्थी शिकत आहेत.
...
क्षमतेच्या आधारावर कार्ये...
या शाळेतील शिक्षकांना त्यांच्या कौशल्य आणि क्षमतेच्या आधारावर कार्ये निश्चित करून दिली आहेत. ज्या शिक्षकाचा विशिष्ट विषयाकडे अधिक कल आहे, त्यांना तशा प्रकारची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यास मदत मिळते.
...
अशी आहे शाळेची दूरदृष्टी
देशातील सर्वोत्कृष्ट शाळांपैकी एक म्हणून शाळा सुधारत आणि विकसित करत राहणार आहोत. मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नावीन्यपूर्ण शिकवण्याचे तंत्र भविष्यातही राबवले जाणार आहे. या शाळेची गुणवत्ता आणि माहिती देण्यासाठी शाळेतील शिक्षक हे स्वतः परिसरात जाऊन पालकांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.
...
शाळेची ओळख...
- २०२१-२२ च्या एज्युकेशन वर्ल्ड रँकिंगमध्ये भारतात पाचवा क्रमांक.
- महाराष्ट्र/मुंबईमध्ये पहिला क्रमांक.
- भारतामध्ये पहिल्या १० सरकारी शाळांच्या यादीत स्थान.
- सलग दोन वर्षे सर्वोत्कृष्ट स्वच्छ शाळेचा पुरस्कार.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06007 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top