
‘जेजे’च्या अधिष्ठात्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान
मुंबई, ता. ३ : मुंबईतील कुलाब्यातील ताजमहल पॅलेस हॉटेलमध्ये यू. एस. इंडिया इंपोर्टस कौन्सिलच्या दहाव्या वर्धापन दिनी जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्या डॉ. पल्लवी सापळे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार अरविंद सावंत, पर्यावरण व यूएसआयसीच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होत्या. कोरोना महामारीच्या काळात ओढावलेल्या संकटाच्या वेळी हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, डॉक्टर, कम्युनिटी हेल्थ वर्कर, स्वच्छता कर्मचारी, पोलिस, स्वयंसेवक, रुग्णवाहिका चालक व विविध सामाजिक संस्था शासनाच्या पाठीशी खंबीरपणे राहिल्या. त्यांनी आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून बजावलेल्या निःस्वार्थ वैद्यकीय सेवेबद्दल या योद्ध्यांचा कोविड योद्धा म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा गौरवण्यात आले. राज्य शासनाच्या माध्यमातून कोविड काळात वैद्यकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व व रुग्णसेवेचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. पल्लवी सापळे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सापळे यांनी राज्यातील विविध शासकीय संस्थांमध्ये उल्लेखनय कार्य केले आहे. यूएसआयसी फाऊंडेशनच्या वतीने आशीष पेडणेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06028 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..