
नवनीत राणांच्या खारमधील घराला नोटीस
मुंबई, ता. ३ : मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्याच्या खार येथील घराला नोटीस बजावली आहे. त्यानुसार पालिका अधिकारी बुधवारी (ता. ४) राणा यांच्या घराची तपासणी करणार असल्याचे समजते.
घरात मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय काही नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने तपासासाठी नोटीस बजावली आहे. ४ मे रोजी मुंबई महापालिकेचे पथक राणा दाम्पत्याच्या घराची तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याने मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली. आता जामिनासाठी राणा दाम्पत्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यावरही उद्या ४ मे रोजी निर्णय होणार आहे. पालिकेच्या नोटिशीमुळे आता राणा दाम्पत्याचा अडचणी अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06032 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..