मुंबईतील शाळांची ऑनलाइन संचमान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील शाळांची ऑनलाइन संचमान्यता
मुंबईतील शाळांची ऑनलाइन संचमान्यता

मुंबईतील शाळांची ऑनलाइन संचमान्यता

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : गेल्या काही माहिन्यांत अनेकदा सूचना केल्यानंतरही संचमान्यता न केलेल्या अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना शिक्षण विभागाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. बुधवारपासून (ता. ४) संचमान्यतेचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध केली. त्यानंतरही एखाद्या शाळेने प्रस्ताव सादर न केल्यास संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
शिक्षण विभागाकडून सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची संचमान्यता केली जाणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दक्षिण मुंबई, पश्चिम मुंबई आणि
उत्तर मुंबई विभागातील संचमान्यतेचे प्रस्ताव हे ४ ते ८ मे या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयातील संचमान्यतेचे प्रस्ताव हे ९ ते १३ मे या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. यासाठी www.dydemumbai.com या संकेतस्थळावर माहिती भरणे आवश्यक आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या लॉगिनसाठी यूडायस क्र. व त्यापुढे लहान लिपीतील a असा लॉगीन आयडी आहे (उदा. २७२३०३००२२४a) व पासवर्ड dyd१२३४ असा देण्यात आल्याची माहिती उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06033 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top