राज्यात दिवसभरात १८२ नवीन कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात दिवसभरात १८२ नवीन कोरोना रुग्ण
राज्यात दिवसभरात १८२ नवीन कोरोना रुग्ण

राज्यात दिवसभरात १८२ नवीन कोरोना रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : राज्यात मंगळवारी १८२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून सोमवारच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. सोमवारी एकूण ९२ नवे रुग्ण आढळले होते. आता राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७,८७,८१७५ वर गेली आहे. आज १७० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२९,३०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण १०२७ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसेंदिवस सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असून राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात मंगळवारी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. औरंगाबादमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्युदर १.८७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०२,५०,५२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७८,१७५ (०९.८४ टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06034 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top