चित्रकला परीक्षांचा निकाल 10 मे पूर्वी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रकला परीक्षांचा 
निकाल 10 मे पूर्वी?
चित्रकला परीक्षांचा निकाल 10 मे पूर्वी?

चित्रकला परीक्षांचा निकाल 10 मे पूर्वी?

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : राज्य कला संचालनालयामार्फत ९ ते ११ एप्रिलदरम्यान घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमीजिएट चित्रकला परीक्षेचा निकाल १० मेपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. कला संचालनालयाची निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिली.
राज्यात यंदा नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी व इंटरमीजिएट चित्रकला परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच घेण्याचे नियोजन होते; मात्र त्या वेळी दहावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असल्याने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर ९ ते ११ एप्रिलदरम्यान या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून १० मेपूर्वी निकाल लागण्याची शक्यता असल्याची माहिती संचालनालयातील वरिष्ठ अधिकारी सूत्रांनी दिली.
---
... म्हणून १० मेपूर्वी निकाल
दरम्यान, दहावी-बारावीच्या शास्त्रीय कला, चित्रकला, लोककलेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याबाबतचे प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करण्यास शाळांना १५ मेपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत हे प्रस्ताव सादर करणे बंधनकारक असल्याने कला संचालनालयाकडून एलिमेंटरी व इंटरमीजिएट परीक्षेचे निकाल १० मेपूर्वीच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06037 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top